पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २९ हजार ४१४ क्युसेक्स विसर्ग वाढऊन सकाळी ११ वाजता ३५ हजार २०० क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खडकवासल्यातून ३५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहरातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. सिंहगड रोड परिसरातील एकतानगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. सोसायटीमधील नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे.
पुण्यात आज सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. आज हवामान विभागाने शहराला रेड अलर्ट जारी केला आहे. शहारमध्ये पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. तसेच जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अन् पुण्यातल्या खड्यांवरून मोहोळ झाले आक्रमक, म्हणाले “कामात हयगय करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना…”
-भाजपचे कार्यकर्ते करणार वाहतूक पोलिसांना मदत; शहराध्यक्ष धीरज घाटेंची माहिती
-१५ दिवसांत शरद पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?
-‘ढेकणाला आव्हान द्यायचं नसतं, त्यांना…’; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिली ढेकणाची उपमा