पुणे : पुणे शहराला गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. पुण्यात बुधवारी सायंकाळी अवघ्या २ तासात पडलेल्या पावसाने वाहतुकीचा बोजवारा उडाला. आधीच वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त असलेल्या पुणेकरांच्या अडचणीत पावसाने भर पडली. मुसळधार पावसाने शहारातील अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
आजही (गुरुवार) दिवसभर शहरात पावसाने हजेरी लावली आहे. आज, २६ सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाने राज्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा तसेच कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यात आज संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-गावात स्मशानभूमी नाही, तर मतदान नाही; हवेली तालुक्यातील ‘या’ गावकऱ्यांची आक्रमक भूमिका
-पंतप्रधान मोदींचा ‘ती’ खास पगडी घालून होणार होता सन्मान, पण….
-मोदींचा दौरा रद्द; मविआ आक्रमक, उद्याच करणार मेट्रोचं उद्घाटन
-मोदींचा दौरा रद्द, पण अजितदादांनी पहाटेच केली मेट्रोच्या कामाची पाहणी
-ना भाई, ना ताई! कसब्यात काँग्रेसमध्ये वाद पेटला, धंगेकर समर्थकांच्या बॅनरमुळे चर्चेला उधाण