पुणे : राज्यासह पुण्यातही कडाक्याची थंडी जाणवत आहे. थंडीचा जोर चांगलाच वाढल्याने पुणे आणि परिसर गारठल्याचे पहालयला मिळत आहे. किमान तापमानात घट होत असल्याने आज १६ डिसेंबर यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुणेकरांना आता दिवसाही हुडहुडी भरत आहे. गेल्या काही दिवस पुण्यात उन्हाळा जाणवत होता.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार सोमवारी एनडीए येथे सर्वांत कमी ६.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर शिवाजीनगर येथे ७.८, लोहगाव येथे १२, कोरेगाव पार्क येथे १३.१, चिंचवड येथे १४.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे. गेल्या २ दिवसांपासून पुणे शहराला थंडीचा तडाखा जाणवत आहे. तर येत्या काही दिवस पुणेकरांना थंडीची हुडहुडी कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात थंडीची लाटसदृश स्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी एक आकडी तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे सध्या जाणवत असलेली थंडी आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शेतकऱ्याचा मुलगा साखर कारखान्याचा संचालक ते कॅबिनेट मंत्री; दत्तात्रय भरणेंची राजकीय कारकिर्द
-नागपूरात शपथविधी अन् बारामतीत फडणवीसांचा बॅनर जाळला; नेमकं काय घडलं?
-मैत्रीसाठी केला मोठा गुन्हा; मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ नये म्हणून केला गोळीबार, अन्….
-स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालिकेचं उचललं महत्वाचं पाऊल
-कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाचं पाऊल; जिल्ह्यात २७ तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू