पुणे : पुणे शहरामध्ये रविवारपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरु आहे. अशात परिस्थीतीमध्ये अनेक भागांमध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन प्रशासनाकडून बचावकार्य कशाप्रकारे सुरु आहे याबाबतचा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवारांनी महत्वाची माहिती दिली आहे.
“सगळ्या धरणांचे जिथे कॅनाल आहेत ते सोडायला सांगितले आहेत. पाऊस आटोक्यात आला आहे. पण नागरिकांना विनंती आहे घाबरु नका. पुण्यात सिंहगड रोड भागात आर्मी तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफचे ४० जवान पाणी साचलेल्या भागात तैनात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुद्धा या परिस्थितीवर लक्ष आहे”, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
पुणे शहर आणि जिल्हाभर मुसळधार सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने पुणे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक सोसायटी आणि घरांमध्ये वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.पुराचा फटका बसलेल्या भागात प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता असल्याने शहरातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकनाकडून काही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असेल तरंच घराबाहेर पडावे. नदी, नाले, ओढे, धरण, पूरस्थिती असलेल्या सखल भागात जाणे टाळावे. डोंगर, टेकड्या, दऱ्या, धबधब्यांसारख्या ठिकाणी पुराचे पाणी अचानक वाढणे, निसरड्या वाटेवर पाय घसरुन अपघात होण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सद्यस्थितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये. दरड प्रवण, पूरग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, आवाहनांचे पालन करावे. स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात येताच अजित पवार अॅक्शन मोडमध्ये; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
-पुण्यात पावासाचा हाहाकार! कामाशिवाय घराबाहेर पडू नका; पालकमंत्री अजित पवारांचे नागरिकांना आवाहन
-संघटनेतून काढलं पण शेतकऱ्यांच्या मनातून कसे काढणार? रविकांत तूपकरांचा राजू शेट्टींवर घणाघात
-लोकसभेच्या पराभवानंतर आढळराव पाटलांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी