पुणे : पुणे शहरामध्ये अनेक भागामध्ये अतिमुसळधार पावसामुळे पाणी साठले होते. खडकवासला धरणक्षेत्रातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागामध्ये सोसायट्या तसेच घरांमध्ये पाणी शिरले आहे. सिंहगड रोडवरील एकतानगरमध्ये अनेक सोसायट्या, घरांमध्ये पाणी शिरले आहे. गुरुवारी सकाळपासून या भागातील वीजसेवा खंडित करण्यात आली आहे.
पुण्यात नदीच्या पातळीत वाढ तर झालीच होती. त्यातच सलग सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाने देखील पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. खडकवासला धरणातून विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. सिंहगड रोड, एकतानगर परिसराला गुरुवारी जलमय रुप आले होते. आज खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे पूरस्थिती (Pune Rain Update) नियंत्रणात आली आहे. तसेच पावसाने देखील आज विश्रांती घेतली आहे. सिंहगड परिसरात अनेक भागांमध्ये साचलेले पाणी ओसरले असले मात्र, अद्यापही या भागामध्ये वीज पुरवठा खंडीत आहे. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची कमतरता आहे. या भागात वीज खंडीत असण्याचे कारण आता अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
‘वीजेचे पॅनल आणि मीटर बोर्ड ओले आहेत. त्यामुळे शॉक लागण्याची शक्यता आहे. आपण हळूहळू वीज पुरवठा सुरू करणार आहोत. थोड्या वेळात वीज पुरवठा सुरू केला जाईल. ज्या घरातील मीटर बोर्ड ओले आहेत त्यांना काहीसा वेळ लागणार आहे. काही वेळाने वीज पुरवठा सुरू केला जाईल. काही भागात वीज सुरू केली आहे. टेस्टींग व्हॅन देखील या भागात आहे. ज्या भागात बोर्ड ओले नाहीत त्या भागात वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे’, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन
-पुण्यात पूरस्थिती! मोहोळ अधिवेशन सोडत थेट पुण्यात पोहचणार; जागेवर जाऊन करणार पाहणी
-पुण्यात येताच अजित पवार अॅक्शन मोडमध्ये; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना