पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. सध्या विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा आहे. यावर आता पक्षातीलच फायब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास त्यांनी विरोध केला आहे. रुपाली पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.
‘एक व्यक्ती एक पद’ या न्यायानुसार आमचे अजित पवार हे न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार?
काल पासून बातमी वाचत आहे,बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती की, राष्ट्रवादीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने,दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत. त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा, इतर महिलांना समान संधी द्यावी, असे म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाकडे विनंती केली आहे.
दरम्यान, मनसेला रामराम करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पहिल्यांदाच अशी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी त्यांनी महिला प्रदेशाध्य आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन सर्व महिलांना समान संधी मिळावी यासाठी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील रुपाली पाटलांचा रोख हा चाकणकरांकडेच होता. मात्र आता त्यांनी सोशल मीडियावर आपलं मत मांडलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ; आपल्या दोन्ही लेकरांचा मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किमीची पायपीट
-‘आता बाप दाखव नाहीतर तर श्राद्ध कर, हा सूर्य…’; पंकजा मुंडेंची शरद पवार गटावर आगपाखड
-गणेशोत्सवात आवाज कमी; गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना मेधा कुलकर्णींचं आवाहन
-नाना पटोलेंसाठी भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणा अन् बागुलांना उमेदवारी देण्याची मागणी