पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दौरे करत आहेत. अशातच या दौऱ्यादरम्यान अजित पवार नेहमी गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये पहायला मिळाले. अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरुन विरोधकांनी अनेकदा टीकाही केली. त्यातच आता काँग्रेसचे पुणे कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवर टिपण्णी केली आहे.
अजित पवारांना ज्योतिषांनी सांगितल असेल तर त्यांचा विषय आहे. हे कपडे घालून तुम्ही महाराष्ट्राशी कसे वागले आहेत यात बदल होणार आहे का? कपडे आज घातले उद्या काढायचे आसतात. जे चांगलं केलं ते लक्षात राहतं वाईट पण राहतं, जर कपडे घालून कोण निवडून आलं असतं तर कपड्याचे दुकानदारच मुख्यमंत्री झाले असते, असे म्हणत रवींद्र धंगेकर यांनी अजित पवारांना सुनावल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी नदी सुधार प्रकल्पावरु अजित पवारांना चांगलेच धारेवर धरले. याबाबत बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘नदी सुधार प्रकल्प म्हणजे पुणेकरांची लूट आहे. पूरग्रस्तांचे आणखी पंचनामे पूर्ण नाहीत. मदत नेमकी कधी मिळणार? मुख्यमंत्री येऊन गेले, घोषणाबाजी करुन गेले. ठेकेदार आणि प्रशासन एकत्र काम करत आहेत. महापालिका आयुक्त फक्त ठेकेदारांचे काम करत आहेत. आर्थिक तरतूद नसताना सरकार फक्त घोषणाबाजी करत आहे’, असे सांगत पालिका प्रशासन तसेत सत्ताधाऱ्यांवर रवींद्र धकंगेकरांनी आगपाखड केली.
महत्वाच्या बातम्या-
-पूजा लांडगेंकडून ‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’चे आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
-Pune: सिंहगड रोडवरील उड्डाणपूलावरुन ठाकरे गट, शरद पवार गट अन् भाजपमध्ये मोठा वाद