पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होत नाही. त्यातच आता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रूमला फोन करत ‘मला महेश लांडगे यांची सुपारी मिळाल्याचं सांगत लांडगे यांना दिली जीवे मारण्याची धमकी दिली’ असे सांगण्यात आले.
या प्रकरणी मोशीमधील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. उदय कुमार असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार महेश लांडगे यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
एका तरूणाने पिंपरी चिंचवड पोलिस कंट्रोल रूमला फोन करत मला महेश लांडगे यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे, अशी माहिती दिली. या प्रकरणात एकाला अटक केला आहे, त्याच्यावर भोसरीत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्यांदा ही धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या चरणी एक कोटींचा हिरा
-‘नितेश राणेंनी मुस्लीम समाजाची माफी मागावी’; रिपब्लिकन पक्षाची मागणी