पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ लोकसभा निवडणुका जिंकल्या. लोकसभेतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात आनंदाचे वातावरण असताना आता पक्षातील अंतर्गत दुपारी हळूहळू पुढे येताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा ‘सेनापती’ म्हणून उल्लेख असणाऱ्या बॅनर्स पुण्यामध्ये लावण्यात आले होते. आमदार रोहित पवार यांनी याच बॅनरचा आधार घेत पक्षांमध्ये कोणीही ‘सेनापती’ नाही, असे म्हणत जयंत पाटील यांच्यावर उपरोधिकपणे टीका केली आहे. एका बाजूला हे नाट्य रंगले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांना खोली वापर देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आठ लोकसभा ज्यांच्या नेतृत्वामध्ये जिंकला गेला त्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विजयाचे श्रेय मिळू नये म्हणून रोहित पवार यांच्याकडून राजकारणात केले जातं असल्याचं थेट आरोप केला आहे. बारामती मध्ये सध्या अजितदादा यांची जागा घेण्यासाठी योगेंद्र पवार व रोहित पवार यांच्यामध्ये स्पर्धा सुरू असून या दोन दादांच्या लढाईमध्ये सेनापती जयंत पाटील यांचा बळी दिला जात असल्याची टीकाही मानकर यांनी केली आहे.
पुढे बोलताना मानकर म्हणाले “एखाद्या माणसाचं पक्षामध्ये अस्तित्व वाढलं तर काही लोकांना त्याचा खूप त्रास होत असतो. आता जयंत पाटलांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या गटाने लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या, १० पैकी ८ जागांवर विजय मिळाल्याने पाटील यांना एवढा सन्मान मिळत असल्याने त्यांचे दोर कापले जात आहेत” असं दीपक मानकर म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गडाला मिळालेल्या विजयाचे क्रेडिट जयंत पाटील यांना द्यायला हे तयार नाहीत. त्यामुळे पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी अजितदादांच्या प्रवाहामध्ये यावे त्यांचा अतिशय योग्य सन्मान राखला जाईल”, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची विनंती दीपक मानकर यांनी जयंत पाटील यांना केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ट्रॅव्हल्समुळे हडपसरमध्ये वाहतूक कोंडी; आमदार तुपे उतरले रस्त्यावर
-‘एकच मुलगी असलेल्या बापाला अनेक गोष्टी…’; शरद पवारांचं बारामतीत मोठं वक्तव्य
-“तुम्ही नगरसेवक नसतानाही केलेलं काम…” सत्यजीत तांबेंची मोहोळांसाठी ‘खास’ पोस्ट
-शिरूरमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ वक्तव्याने मोठा वाद
-“बारामतीच्या विकासासाठी मोदींची मदत घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही”