पुणे : विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक वारसा जपणारी राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. शहरातील गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी एकीकडे पोलीस प्रशासनाकडून अनेक विविध उपाययोजना करत असतात. तर सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने लोकप्रतिनिधींना धारेवर धरत आहेत. अशातच आता पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना ‘पुण्यात शांतता सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारी रोखणे गरजेचे आहे. गुन्हेगारांवर थेट कारवाई करा, त्यांची धिंड काढा’, असं म्हणत पोलिसांना सूचना दिल्या आहेत.
अजित पवारांच्या सूचनांनंतर पुणे पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. दहशत पसरवणाऱ्या भागांमध्येच गुंडांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांकडून त्यांची धिंड काढली जात आहे. ज्या ठिकाणी गुन्हा केला, त्याच ठिकाणी गुंडांची वरात, धिंड काढण्याचा पॅटर्न पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. तरीही काही गुंड याला जुमानत नसल्याचं चित्र आहे. त्यांना आता पुणे पोलिसांनी सज्जड दम दिला आहे. ‘महिलांची छेडछाड काढाल, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू, असा सज्जड दमच पोलिसांनी गुडांना दिला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, पुणे शहरामध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद, हाणामारी, खून, हत्या, चोऱ्या, वाहनांची तोडफोड, महिलांवरील अत्याचार, कोयते हातात घेऊन दहशत माजवणे, अशा अनेक घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या घटनांवर आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आता पुणे पोलीस आता अॅक्शनमोडवर आल्याचे पहायला मिळात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आपल्याकडील लोक बँकॉकला का जातात? ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे
-सावंतांच्या लेकाला बँकॉकला जाण्यासाठी ६८ लाख, पण तुम्हाला जायचं असेल तर किती खर्च?
-पुण्यातील बड्या मंत्र्यानं सूत्रं हलवली अन् सावंतांच्या लेकाचं विमान हवेतूनच फिरलं माघारी