पुणे : पुणे शहर पोलिसांनी काही दिवसांपासून पुण्यातून तसेच कुरकुंभ एमआयडीसीमधून कोट्यावधींचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी ‘ड्रग्ज फ्री पुणे’ या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात येते आहे. रॅकेटची पाळेमुळे खोदण्यासाठी १० पथके तैनात केली आहेत. दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद या प्रमुख शहरासह पुणे पोलिसांचे पथकं अनेक गोडाऊनमध्ये ड्रग्जचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विकी माने, हैदर शेख, अनिल साबळे, अजय करोसिया आणि युवराज भुजबळ या पाच जणांना अटक केली. ड्रग्ज तयार करणाऱ्या इंजिनिअरला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील २ हजार किलो ड्रग्स रॅकेटचा मास्टरमाईंड कोण? असा प्रश्न उपस्थित होत असून ‘सॅम ब्राऊन’ या नावाने फिरणाऱ्या परदेशी नागरिकाचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. या सॅम नावाच्या मास्टरमाईंडचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना ३ महिन्यात २००० किलो एमडी बनवण्याचे टार्गेट दिल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे.
सॅमनेच भुजबळ नावाच्या आरोपीला एमडी बनवण्याचा फॉर्म्युला दिल्याचे सांगितले जात आहे. युवराज भुजबळ याला पुणे पोलिसांनी डोंबिवलीमधून अटक केली आहे. त्यावरुन भीमाजी उर्फ अनिल साबळे आणि युवराज भुजबळ यांनी कुरकुंभ येथे सुरू ड्रग्जचा कारखाना सुरु केला होता. पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसीतील कारखान्यावरही छापा मारत मोठी कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“येणाऱ्या काळात अजित पवार एकटे पडतील, भाजप नेहमीच मित्रपक्षाला संपवतं”
-पिंपरी महापालिकेच्या बजेटमध्ये या ३ आमदारांना झुकतं माप; चिंचवडच्या पदरी भरीव निधी
-अजित पवारांना मोठा धक्का, सख्या पुतण्याच शरद पवारांसोबत; बारामतीत नेमकं घडतंय काय?
-शिवाजीनगर पोलिसांची जबरदस्त कामगिरी; चोरी करुन कोयते बाळगणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
-भाजपचा ‘तो’ प्लॅन सक्सेस! मेधा कुलकर्णींसह राज्यसभेवर चव्हाण, गोपछडेंची बिनविरोध निवड