पुणे : पुण्यात ड्रग्ज साठा जप्त केल्यानंतर या प्रकरणातील नवनविन खुलासे दररोज होत आहेत. पुणे गुन्हे शाखेने आतापर्यंत ४ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. या प्रकरणाचं मूळ शोधण्यासाठी पुणे गुन्हे शाखेने याप्रकरणात ८ आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर आरोपींनी वापरलेले कोडवर्ड्स आता समोर आले आहेत.
अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. या तपासामध्ये त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल डेटा तपासल्यानंतर गुन्हेगारांची टोपण नावं समोर आली आहेत. याच टोपण नावांचा वापर करत पेडलर ड्रग्जची तस्करी करतात. राज्यासह देशभरात मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नावांचे कोडिंग वापरले आहेत. हे कोडींग, टोपण नावं आता पोलिसांना मिळाले आहेत.
मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी ‘लंबा बाल’ आणि ‘मुंबई का बंदर’ या टोपण नावांचा वापर करण्यात आला. सराईत वैभव माने याला केसांची शेंडी होती. त्यामुळे त्याला ‘लंबा बाल’ म्हणून ओळखले जात होते. मुंबईत राहणारा युवराज भुजबळ याला ‘मुंबई का बंदर’ म्हणून टोपण नाव दिलं होतं. आरोपींचा मोबाइल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला कोडिंगची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कुरकुंभ एम.आय.डी.सी. येथील एका कारखान्यात तयार होत असलेल्या ड्रग्सला ‘कोडवर्ड’ दिला होता. एमडी ड्रग्स बनवायच्या फॅार्म्युलाचा कोड वर्ड ‘न्यू पुणे जॅाब’ असा होता. ‘न्यू पुणे जॅाब’ ची जबाबदारी युवराज भुजबळवर होती, असे तपासात समोर आलेय. भुजबळ हा केमिस्ट्री विषयातील पी. एच. डी. धारक असून त्याला डोंबिवली मधून अटक करण्यात आली.
ॲाक्टोबर २०२३ पासून सुरू होती एम डी ड्रग्जची निर्मीती करत होता. अँटी मलेरिया ड्रग काँपोनंट आणि ॲंटीरस्ट हे २ रसायन कुरकुंभमधील एका कारखान्यात तयार होत होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ येथे केलेल्या कारवाईत ६५० किलो एवढे ११०० कोटी रुपयांचे एम डी ड्रग्ज जप्त केले होते.
महत्वाच्या बातम्या-
-सदाशिव पेठेतील जिममधील सामानाची चोरी; ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी
-पुणे ड्रग्ज कनेक्शन अंडरवर्ल्ड, दुबईत?; पुण्यात बनवलेल्या ड्रग्जची थेट लंडनला विक्री
-शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी; धमकी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
-शिक्षण फक्त दुसरीपर्यंतच मात्र, ५ राज्यातला अट्टल ड्रग्जमाफिया अखेर पोलिसांच्या ताब्यात
-१३६ वर्षांनंतर इतिहास घडला! वारसा आजोबा अन् वडिलांचा आता लेकही बनली ‘फायरमन’