पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या गुंडांसह तिघांना अटक केली. त्यानंतर सोमवारी रात्री विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदमात छापा टाकून ५५ कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
वैभव उर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५)आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने गुंड पिंट्या माने आणि अजत करोसिया यांना सापळा लावून पकडले.
पिंट्या माने आणि अजय करोसियाकडून पोलिसांनी एक कोटी रुपयांचे ५०० ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. पोलिसांनी दोघांची चौकशी केली. तेव्हा विश्रांतवाडीतील हैदर शेखने मेफेड्रोन विक्रीस दिल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके पाठविण्यात आली. हैदरला पोलिसांनी ताब्यात घेतले. हैदरकडून अडीच कोटींचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
पोलिसांनी हैदरने १०० ते २०० मिठाच्या पोत्यांमध्ये लपविलेले ५५ किलो मेफेड्रोन जप्त केले असून, जप्त केलेल्या ५५ किलो मेफेड्रोनची किंमत ५५ कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोदामाच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या परदेशी साथीदारांच्या मागावर गुन्हे शाखेची दहा पथके रवाना झाली आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील हॉटेल्स आणि पब धिंगाण्याबाबत पोलिसांची नियमावली जाहीर
-पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ४ कोटींचे ड्रग्ज जप्त; आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय
-पिंपरी-चिंचवडचे सहायक आयुक्त लाच प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात
-पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; परिसरातील गाड्यांची तोडफोड करत कोयते हवेत भिरकावले
-पुण्याची गुन्हेगारी थांबणार कधी?; पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न