पुणे : राज्यातील बीड शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असून बीडमधील मारहाणीचे व्हिडीओ वारंवार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच पुणे शहर विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहराची वाटचाल आता बीडच्या दिशेने चालली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुसंस्कृत पुणे अशी जगभर प्रसिद्धी असणाऱ्या पुण्याने आता बीडला मागे टाकल्याचं समोर येत आहे.
पिंपरी चिंचवडमधील एका पोलिसाने नियम वेशीवर टांगत स्वत:च्या बर्थडेचे जोरात सेलिब्रेशन केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बर्थडे सेलिब्रेशनचे आयोजन गुन्हेगारांनी केले असल्याची माहिती मिळत आहे. या पोलिसाच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
सांगवी पोलीस स्टेशनच्या दारात रात्री बाराच्या ठोक्याला पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी ४ गुन्हेगारांनीच या वाढदिवसाचे आयोजन केले होते. गुन्हेगारांकडून प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवी पोलिस स्टेशनच्या दारात केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून केक कट केल्याचे व्हिडीओमध्ये देखील पाहायला मिळत आहे.
आकाशात आतिषबाजी स्काय शॉट आणि आयटम बॉम्ब. फटक्यांची फायर गन, अशा जल्लोषात पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. पाटील यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन ड्रोनद्वारे चित्रित केल्याचंही पहायला मिळाले आहे. त्यामुळे आता पुण्याने बीडला मागे टाकल्याचं स्पष्ट दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात आढळला मानवी हाडांचा सांगाडा, मोबाईल अन् आधारकार्डही; पुढे काय घडलं?
-गोरे म्हणाले ‘त्या प्रकरणी माझी निर्दोष मुक्तता’, पीडित महिला म्हणाली, ‘ही केस…’
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: नराधम दत्ता गाडेच्या चौकशीत धक्कादायक फोटो आले समोर
-धक्कादायक! एक दिवसाच्या बाळाचा मृतदेह कब्रस्तानातून गायब; पुण्यात नेमकं काय घडलं?