पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर होते. एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची सभा होणार होती. मात्र, शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पुणे शहरातील मेट्रो शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी आणि स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होणार होते. शहरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
एकूणच सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोच्या कामाचा सकाळी ६ वाजता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. बाणेर, आरबीआय चौक, संचीती हॉस्पिटल या ठिकाणी स्वतः जाऊन मेट्रोचा कामाचा आढावा घेतला आहे.
पुणेकरांच्या सुखकर व सुलभ प्रवासासाठी पुणे मेट्रोचा आणखी एक टप्पा लवकरच सुरू होणार आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन या देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यांच्या पुणे दौऱ्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेत… pic.twitter.com/FsbXMyD4k3
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 26, 2024
अजित पवार मेट्रोची पाहणी करत असताना मेट्रोचे सर्व अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी त्यांना कामाची माहिती दिली. अजित पवारांनी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मोदींच्या दौऱ्यापूर्वीच अजित पवारांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली.
महत्वाच्या बातम्या-
-ना भाई, ना ताई! कसब्यात काँग्रेसमध्ये वाद पेटला, धंगेकर समर्थकांच्या बॅनरमुळे चर्चेला उधाण
-शरद पवार करणार अजितदादांची कोंडी; ‘त्या’ १२ मतदारसंघात लावली जोरदार फिल्डींग
-दौरा मोदींचा, शक्तीप्रदर्शन इच्छुकांचं; शहरभर झळकले बॅनर्स
-वडगाव शेरीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा कायम; महाविकास आघाडीत रस्सीखेच