पुणे : झिका व्हायरसने पुणेकरांची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. पुण्यात झिका व्हायरसची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहरामध्ये आता झिकाचे एकूण रुग्णसंख्या १९ वर पोहचली आहे. पुण्यात एका जेष्ठ नागरिकाला झिकाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. झिकाची लागण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
हडपसर येथील ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला झिकाची लागण झाल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या ज्येष्ठ नागरिकाला गॅस्ट्रोएन्टेरिटिससाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांना झिकाची व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरात आतापर्यंत १९ रूग्ण सापडले आहे. त्यापैकी सर्वाधिक ६ रुग्ण एरंडवणे परिसरातील आहेत. एरंडवणे ६, मुंढवा ३, डहाणूकर कॉलनी २, पाषाण- ३आंबेगाव १, खराडी-३ येरवडा -१, असे एकूण १९ झिका रुग्ण शहरामध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत पुण्यात आढळून आलेल्या झिकाच्या १९ रुग्णांपैकी १० रुग्ण या गर्भवती महिला आहेत. शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून झिकावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे. शहरात गर्भवती महिलांच्या चाचण्या देखील करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ भागात सर्वाधिक पाऊस; अनेक भागात ऑरेन्ज, यलो अलर्ट जारी
-श्री स्वामी समर्थ: तुमचं जीवन बदलून टाकतील स्वामी ‘हे’ विचार, वाचा स्वामींचे आजचे उपदेश
-विधान परिषदेमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय; योगेश टिळेकरांचा दणदणीत विजय
-१४ जुलै रोजी बारामतीत होणार धमाका?, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची बारामतीत सभा