पुणे : पुणे शहरामध्ये सध्या झिकाचा धोका वाढू लागला आहे, त्यामुळे आता पुणेकरांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. पुणे शहरामध्ये आता झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता २१ वर पोहचली आहे. शहारमध्ये झिका सोबतच डेंग्यूची देखील रुग्णसंख्या वाढत आहे. जून महिन्यात पुणे शहरामध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत शहरामध्ये झिकाची व्हायरसच्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.
झिका व्हायरसच्या रुग्णांपैकी १० गर्भवती महिलांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड, मुळशीतील भूगाव या ठिकाणी झिकाची व्हायरसचा प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. शहरातील कोथरुड, एरंडवणे, मुंढवा, डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव, खराडी, येरवडा या भागामध्ये झिकाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गर्भवती महिला आणि पोटातील बाळातील असतो. त्यामुळे गर्भवती मातांच्या चाचण्या आणि तपासणीवर पालिकेकडून भर दिला जात आहे. झिका व्हायरससह शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतील मोठी वाढ दिसून येत आहे. या जुलै महिन्यात डेंग्यूचे एकूण २१६ संशयित रुग्ण आढळले असून डेंग्यू देखील झपाट्याने वाढत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासोत्पत्ती जागा शोधून त्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! झिका वाढतोय, शहरात रुग्णांचा आकडा १९ वर; वाचा सर्वात जास्त धोका कोणत्या भागात?
-राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ भागात सर्वाधिक पाऊस; अनेक भागात ऑरेन्ज, यलो अलर्ट जारी
-श्री स्वामी समर्थ: तुमचं जीवन बदलून टाकतील स्वामी ‘हे’ विचार, वाचा स्वामींचे आजचे उपदेश
-विधान परिषदेमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय; योगेश टिळेकरांचा दणदणीत विजय