पुणे : पुणे शहरामध्ये महिला अत्याचाराच्या घटना रोज घडलेल्या पहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील बोपदेव घाटामध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेला आता तब्बल ८ दिवस उलटून नवव्या दिवशी आज एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेवरुन राजकीय नेते आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
बोपदेव घाटामध्ये ३ ऑक्टोबरला २१ वर्षीय तरुणी तिच्या मित्रासोबत रात्री ११:३० वाजताच्या सुमारास फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिथे ३ नराधम आले आणि त्यांनी पीडित तरुणीच्या मित्राचे हात शर्टने तर पाय बेल्टने बांधून तिघा नराधमांनी तिला पळवून नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना घडल्यानंतर ८ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती आरोपी लागत नव्हते. मात्र, यातील एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
येवलेवाडी परिसरातील एका मद्याच्या दुकानात मद्य खरेदी करताना तीन संशयित सीसीटीव्हीत कैद झाले होते. या सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुण्यातून एकाला अटक केल्याची माहिती आहे. मात्र दोन आरोपी अद्याप मोकाट असून त्यांचा शोध सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आमदार माधुरी मिसाळांनी सांगितला ‘तो’ किस्सा
-बागुल कुटुंबाच्या आदर्शाचा गौरव, जनसेवा फाउंडेशनतर्फे आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार
-पोर्शे कार अपघातातील आरोपीला निबंध लिहायला सांगाणाऱ्या ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई