पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात पावसाच्या पाण्याने पुणेकर त्रस्त आहेत आणि अशातच आता झिकाचा संसर्ग वाढत आहे. शहरामध्ये डेंग्यू आणि झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून प्रशासनाकडून वारंवार काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच आता याबाबत झिकाची बाधा झालेल्या २ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात झिका रुग्णांची संख्या आता ३७ वर होती. झिकाबाधित असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पत्र लिहिले आहे. रविवारी आणखी ८ झिकाचे रुग्ण आढळून आले आहेत, रुग्णांची संख्या ४५ वर पोहचली आहे.
मृत्यू झालेले पेशंटचे वय हे ७१ वर्षांपेक्षा जास्त होते. त्यापैकी एक रुग्ण सह्याद्री हॉस्पिटल आणि दुसरा रुग्ण हा जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्याचा १४ जुलै रोजी मृत्यू झाला होता. जोशी रुग्णालयातील रुग्ण वारजेमधील १४ जुलै रोजी उच्च रक्तदाबासह आरोग्यासंबंधीच्या आजारांमुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. पण १९ जुलै रोजी त्यांच्या नमुन्यांमध्ये ‘झिका संसर्गा’चे निदान झाले होते. दुसरा रुग्ण खराडी येथील असून, त्याला सह्याद्रीमध्ये दाखल करण्यात आले होते. २१ जुलै रोजी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे देखील झिकाचे निदान झाले.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे: पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अन् मदत करा; मुरलीधर मोहोळांच्या सूचना
-राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार; शिंदे गटाकडून मनधरणीचे प्रयत्न
-‘स्मार्ट सिटी’ म्हणवणाऱ्या पुण्याचा विकास पूरात; एकाच पावसात झाली दुर्दशा