पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या भाषणांमध्ये नेहमी ‘मी पहाटे उठून कामांची पहाणी करण्यासाठी जातो. सकाळी लवकर उठून मी शेताच्या बांधावर जातो’, असे वारंवार म्हटलेलं आपण ऐकलं आहे. यावरुन अनेकदा विरोधकांकडून टीकाही करण्यात आली. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवारांना नाव न घेता यावरुन सुनावलं आहे.
‘कष्ट तर सगळेच करतात. कोणी कोणावर उपकार करत नाही. हे सांगतात ना आम्ही दिवसरात्र काम करतो. आम्ही तुमच्या दारात आलो नव्हतो उठवायला. तुम्हाला हौस आहे ना आमदार मंत्री व्हायची मग करा काम. उपकार करता का? काही लोकांचा एक डायलॉग आहे, मी सकाळी लवकर उठतो. दूधवाला पण उठतो’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
‘तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, कारण तिला चहा करून द्यावा लागतो. पवार साहेबांनी असं कधी भाषण केला आहे का? अरे माझं वय झालंय. मी ४ वाजता उठतो. याउलट ते म्हणतात माझं वय काढायचं नाही. कोणी लवकर उठतो म्हणून दररोज भाषण करत सुटतो का?’, असा सणसणीत सवास सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज्य सरकारने दिलेला ‘तो’ निधी फक्त भाजप आमदारांनाच; निधीतला काँग्रेस, राष्ट्रवादीला रुपयाही नाही
-पुण्यात होणार सर्वात मोठे रुद्रपूजन; पुणेकरांनी सपत्नीक सहभागी होण्याचे चंद्रकांत पाटलांचे आवाहन
-विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाची तयारी पूर्ण; जाहीर केली अंतिम मतदार यादी
-जटोली शिवमंदिरात विराजमान होणार श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा, आकर्षक विद्युत रोषणाई वाढवणार सौंदर्य