पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवारांनी बोरकरवाडी तलावात जनाई योजनेचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे सोडण्यात आले आहे. त्या पाण्याचे पूजन अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडले आहे. यावेळी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
“शरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला. पाण्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, यासाठी आम्ही जनाई शिरसाई योजना केली. १९९१ साली पिंपरी चिंचवडची लोकसंख्या ६ लाख होती, २०४१ ला ती ६१ लाख होईल, योजना करणं आमचं काम आहे. परंतु, त्याचा मेंटेनन्स करणं हे तुमचं काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे”, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
“मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओला सांगितलं आहे, तहसीलदाराला सांगितला आहे, पीआयला सांगितला आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. नाहीतर काका कुतवल. नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल दादा घसरले, दादा कोणावर घसरले नाहीत”, असंही अजित पवार मिश्किलपणे म्हणाले आहेत. अजित पवारांच्या वक्तव्याने उपस्थितीतांमध्ये चांगलाच हशा पिकला.
“काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही”- अजित पवार@AjitPawarSpeaks @mahancpspeaks #AjitPawar #NCP #pune #janai #borkarwadi #trendingreelsvideo #trendingpost #trendingnow #trendingreels pic.twitter.com/Ge1ApIhefg
— Pune Local पुणे लोकल (@pune_local) April 13, 2025
मी इथं अधिकाऱ्यांना घेऊन आलो, त्याचं कारण आहे की, मला काही गोष्टी कळतात. तिथे मुंबईला जर कुठला अधिकारी काय म्हटला तर मला सांगता येतं की, मी तिथे जाऊन आलोय. तुम्ही एअर कंडिशनमध्ये बसून सांगू नका. आधी या भागात कुणालाच पाणी मिळत नव्हतं, तुम्ही त्यावेळेस म्हणालात की, आम्ही जमिनी देतो. आम्हाला पैसे नको फक्त आम्हाला पाणी द्या. परंतु आता तुम्ही पैसे मागायला लागलेला आहात.आम्ही बंद पाईपद्वारे पाईपलाईन करणार आहोत. त्याच्यामुळे खाली जमिनीच्या तीन ते फूट पाईप टाकणार आहोत. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही शेती करू शकता, असंही पुढे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-बांग्लादेशी तरुणीला पुण्यात नोकरीचे अमिष दाखवून आणले अन् बुधवार पेठेत…; नेमकं काय प्रकरण?
-पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावणारा अहिल्यानगर पैलवान नेमका कोण?
-अष्टविनायकासह ‘या’ ५ मंदिरात पोशाखाची नियमावली जारी!; दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे?
-कोल्हापूरच्या सतेज पाटलांच्या पुण्यात महत्वाच्या बैठका; शहराध्यक्ष आणि संघटनात्मक मोठे बदल होणार!