पुणे : बाणेर-बालेवाडी भागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून बालेवाडी येथील सर्वे क्रमांक ४ मध्ये विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) उभारणीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच ही जागा विद्युत विभागाला मिळावी म्हणून कॅबिनेट मंत्री चद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्न करुन विद्युत विभागाला जागा मिळवून दिली आहे.
मुंबईतील विधान भवन येथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी ऊर्जा प्रकल्पाबाबत आढावा घेतला. या बैठकीमध्ये विविध ऊर्जा प्रकल्पांबरोबरच पुण्यातील बालेवाडी उपकेंद्राच्या प्रलंबित कामावरही चर्चा झाली. फडणवीस यांनी महावितरण विभागाला या उपकेंद्राच्या कामासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
“बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हे उपकेंद्र तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी बाणेर बालेवाडी वीज समस्यांचे महत्व लक्षात घेत आपल्या मागणीची तातडीने दखल घेत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत, त्यामुळे येत्या काही काळात ही समस्या सुटेल”, असे म्हणत माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड; उद्या होणार घोषणा
-संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…
-Big News : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक!