पुणे : पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा हे प्रेरणास्थान आहे. कारण येथे देशातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ज्या भिडे वाड्यात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, तिथे स्मारक व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून जोर धरत होती. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यामुळे निर्णय घेता येत नव्हता. भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला.
“स्मारकाच्या निधीची तरतूद झाल्यानंतर, राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांची भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांना याबाबत सविस्तर तपशील सांगितला. तद्नंतर उच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडलेल्या भूमिकेमुळे न्यायालयाने भिडेवाडा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने सकारात्मक निकाल दिला”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिडे वाड्याच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले, ज्यामुळे पुण्याच्या वैभवात अधिक भर पडली आहे. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही फक्त पुणेकरांसाठीच नाही, तर समस्त देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. महापुरुषांच्या स्मृतीला आदर देण्याचे वचन पूर्ण करत, महायुती सरकारने जनतेची बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-पर्वतीत आबा बागुलांची प्रचारात सरशी; घराघरात ‘हिरा’चीच चर्चा
-पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; शरद पवारांच्या आमदाराचा मोदींना सल्ला
-हिंदुत्व रक्षणासाठी महायुतीचं सरकार आवश्यक, म्हणून…; पतितपावन संघटनेचा महायुतीला पाठिंबा
-पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघटनांकडून महत्वाचं पाऊल; पेट्रोलसह काय मिळणार मोफत?
-पुणेकरांच्या ‘त्या’ प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनीच काढला तोडगा