पुणे : दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमा दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी केलं. यावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये मोठा वाद सुरु झाला. गोऱ्हेंच्या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून आक्षेपार्ह टीका करण्यात आली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंवर केलेल्या टीकेचा आता ठाकरे गटाला मोठा फटका बसताना दिसत आहे.
नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावरुन ठाकरे सेनेच्या महिलांनी पुण्यात आंदोलन केले. त्यानंतर या महिलांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये भेटायला बोलावले. या सर्व महिलांना ‘मातोश्री’वर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी केलेलं आक्रमक आंदोलन पाहून उद्धव ठाकरे यांनी महिला आघाडीचे कौतुक केले. उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं अन् तिथून जाताच या महिलांना अपमान झाल्याचं सांगितलं जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या समोरच शिवसेनेतील पद वाटपाचा मुद्दा काढल्यामुळे एक महिला शिवसेना नेत्या चांगल्याच संतप्त झाल्या. कारण महिला आघाडीतील पद वाटपाची जबाबदारी त्या उपनेत्याकडेचं आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यातून आलेल्या या महिलांचा अपमान केला. इतकंच नाही तर तुम्हाला पद कसे मिळते तेच बघते. कुठल्या कोपऱ्यात पडून राहाल ते कळणारही नाही, अशा शब्दात या महिलांचा अपमान केला असल्याचे देखील बोलले जात आहे.
दरम्यान, पुण्यात ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर आक्रमक आंदोलन केले होते. तसेच नीलम गोऱ्हे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या आंदोलनातून शिवसेना कशी होती, याचा प्रत्यय आला होता. तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती. मात्र या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलाच आता शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“स्थायी समिती सदस्य होण्यासाठी माझ्याकडे राऊतांनी २५ लाखांची मागणी” शिंदेसेनेचा गंभीर आरोप
-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी कधी?
-धनुष्यबाण हाती घेण्याआधी धंगेकरांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची ऑफर!
-राजाराम पुलावरील उड्डाणपूलाला ‘नरवीर तानाजी मालुसरे’ नाव देण्याची मागणी
-माणुसकी सोडली, बापाचे ऋण विसरल्या; मुलींकडून मान खाली घालायला लावणारं कृत्य