पुणे : राज्यात विशेषत: पुणे शहरामध्ये महिला सुरक्षित नसल्याच्या वारंवार घटना घडत आहेत. शहरामध्ये गुन्हेगारी वाढतच आहे त्यासोबत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये विविध भागात महिला अत्यचाराच्या घटना घडत आहेत. गुरुवारी काल दोन चिमुकल्या मुलींवर स्कुलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा संताप नागरिक, पालक व्यक्त करत असतानाच शहर परिसरात आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.
बोपदेव घाटात आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका २१ वर्षीय तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली. पुण्यातील बोपदेव घाटातून तरूणीचे अपहरण करून तिला येवलेवाडी परीसरात घेऊन जाऊन तिच्यावर गँगरेप करण्यात आल्याचा हा भयानक प्रकार आहे. पीडित तरुणीवर सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे.
पिडीत तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाटात गप्पा मारत असताना तिथे तिघेजण आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं सांगून तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर त्या तरूणीला कारमधे बसवून येवलेवाडी भागातील एका गल्लीत घेऊन गेले. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून आरोपी नराधम पसार झाले. त्यानंतर तरुणीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे. आता या घटनेबाबत नागरिकांसह आता राजकीय नेते देखील संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘झापूक-झुपूक’नंतर आता ‘डंके की चोटपर’; गुनरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात
-वडिलांना की मुलाला उमेदवारी कोणाला? पुण्यात दोन मतदारसंघात ‘फॅमिली ड्रामा’
-अल्पवयीन आरोपींचं वय किती असावं? अजित पवार करणार शहांकडे मोठी मागणी
-“तो जिंकला पाहिजे” सुरज चव्हाण जिंकण्यासाठी पवार कुटुंबानं केलं बारामतीकरांना आवाहन
-हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! ‘या’ शुभ मुहूर्तावर फुंकणार ‘तुतारी’