पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर आता राज्यभरात मंत्रिपदांसाठी राजकीय हालचाली सुरु आहेत. महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झाल्यानंतर महायुतीतील तीनही पक्षातील आमदारांनी ‘लॉबी’ लावण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता पुण्याचे पालकमंत्री कोण होणार? यावरून भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये पैज सुरू झाली आहे. पालकमंत्री पदासाठी सध्या दोन दादांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषदेवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पुण्याच्या पालकमंत्रीपदाची माळ गळ्यात पडणे महत्वाचे आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक काळ अजित पवार यांनी भूषविले आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री अजितदादाच व्हावेत, असा आग्रह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावून धरला आहे.
२०१४ मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत गिरीश बापट आणि आणि विद्यमान तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे २०२२ मध्ये पालकमंत्री होते. पालकमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजावर नियत्रंण ठेवणे हेसुद्धा शक्य असते. भावी मुख्यमंत्री अजित पवार, अशा आशयाचे बॅनर पुणे शहरात झळकत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह केला जात आहे, तर पालकमंत्रिपदी देखील अजित पवार कायम रहाणार, अशाही चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हयात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण ९ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे पालकमंत्री पदावर अजित पवारांचा दावा या वेळी कायम राहणार आहे. मात्र, ऐनवेळी महायुतीत काही वेगळा निर्णय झाला, तर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही चंद्रकांत पाटील यांच्याकडे देखील जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
-पोर्शे कार प्रकरण: अपघात प्रकरणी आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर
-‘देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत’; हेमंत रासनेंनी व्यक्त केली इच्छा
-“शिदेंना राजकारणातलं जास्त कळत असेल तर फडणवीसांना बाजूला करुन त्यांनाच मुख्यमंत्री करा”- रोहित पवार
-‘गुजरातच्या ईव्हीएममुळे माझ्या मतदारसंघात ५० हजार मतांचा घोळ’; प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप
-निवडणूक संपताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का; गायीच्या दुधात मोठी कपात