पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला शुक्रवारी यात्रेच्या कुस्ती स्पर्धेमध्ये एकाने कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. निल्या घायवळने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवानांना भेटण्यासाठी गेलेल्या घायवळला एका पैलवानाने कानशिलात लगावली आहे. पैलवानाने निलेश घायवळच्या कानाखाली मारल्यानंतर कुस्तीच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. त्यावर कुख्यात गुंडाच्या कानाशिलात मारणारा पैलवान नेमका कोण? त्याने निल्या घायवळला का मारलं? असा प्रश्न उपस्थित झाला.
सागर मोहोळकर असं घायवळवर हल्ला करणाऱ्या पैलवान तरुणाचं नाव आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो एक पैलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. निलेश घायवळ हा फडातील पैलवानांना भेटत असताना सागर मोहोळकर हा गर्दीतून वाट काढत पुढे पोहोचला आणि त्याने थेट निलेश घायवळ याला मारहाण केली होती. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर याच्यावर पोलिसांसमोरच हाणामारी करुन गोंधळ घालण्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सागर मोहळकर याने निलेश घायवळ याला मारहाण का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. निलेश घायवळ याच्यासारख्या दबदबा असलेल्या सागर मोहोळकरची सध्या धाराशिव आणि पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
कोण आहे नेमका सागर मोहोळकर?
वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर मोहोळकरला ताब्यात घेतले. सध्या पोलीसांकडून त्यांची कसून चौकशी सुरु असून पोलीस तपासात सागर मोहोळकर देखील कुख्यात गुंड असल्याची माहिती समोर आली आहे. तो कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्रातही त्याचं मोठं नाव आहे. त्याच्यावर खुनाचे २ गुन्हे दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असणारा सागर तुरुंगवासाची शिक्षा भोगत होता. अशातच खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना त्याने तुरुंगातच आणखी एक खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
-अष्टविनायकासह ‘या’ ५ मंदिरात पोशाखाची नियमावली जारी!; दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे?
-कोल्हापूरच्या सतेज पाटलांच्या पुण्यात महत्वाच्या बैठका; शहराध्यक्ष आणि संघटनात्मक मोठे बदल होणार!
-कुख्यात गुंड निल्या घायवळला पैलवानाने भर मैदानात लगावली कानशिलात; नेमकं कारण काय?