पुणे : पुण्यातील येरवडा भागातील पुणे-नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात सिग्नलवर भर रस्त्यात आपली BMW अलिशान गाडी उभी करुन या तरुणाने लघुशंका केली त्यानंतर त्याने अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार काल समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश अग्रवाल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी गौरव आहुजाने अटकेपूर्वी माफी मागणारा व्हिडीओ शेअर केला. गौरव आहुजाने व्हिडीओमधून शिंदे साहेबांची माफी मागितली आहे. त्यामुळे आता त्याने माफी मागितले शिंदेसाहेब नेमके कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच अश्लील वर्तन करणारा गौरव आहुजा जवळपास १०-१२ तासांनी कराड पोलिसांना शरण गेला. त्यानंतर कराड पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला पुण्यात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना पुण्यात घडली मात्र, आरोपी गौरव आहुजाला पुणे नाही तर कराड पोलिसांनी आहुजाला का अटक केली? असाही सवाल शहरामध्ये उपस्थित होत आहे. आता या प्रकरणी आहुजाला अधिक चौकशीसाठी त्याला सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर देखील उभ करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा सखोल तपास केल्यानंतर सातारा पोलिसांकडून पुणे पोलिसांकडे त्याला वर्ग करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-संजय काकडेंच्या पत्नीला विषबाधा? रुग्णालयात केलं दाखल, नेमकं कारण काय?
-लेकाच्या संतापजनक कृत्यावर बापाची प्रतिक्रिया; ‘तो माझा मुलगा, त्याने सिग्नलवर नाही तर माझ्या…’
-बड्या बापाच्या लेकाचा माज; दारुच्या नशेत रस्त्यावर अश्लील चाळे, पाहा व्हिडीओ
-स्वारगेट अत्याचार: ‘माझ्या बदनामीला जबाबदार कोण?’ पीडितेच्या प्रश्नावर पोलीस काय म्हणाले?