पुणे : नुकतेच शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेले पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ‘मला वारंवार फोनवर जीवे मारण्याची धमकी येत असल्याचे सांगितले आहे. त्यातच याप्रकरणामध्ये मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे वसंत मोरे यांनी नाव घेतले आहे. साईनाथ बाबर यांनी धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केल्यामुळे पुण्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
“या संदर्भात मी कायदेशीर कारवाई केली आहे. या सर्व घटनांमागे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हेच आहेत. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आल्यानंतर गेल्या १५ दिवसांपूर्वी मला धमकीचा फोन आला. १५ दिवसांपूर्वी एक व्यक्ती मला दिवसभरात १५ ते २० वेळा कॉल करत होती आणि फोन केल्यानंतर तो काहीच बोलत नव्हता, थेट शिवीगाळ सुरू करायचा. शेवटी मी त्या व्यक्तीचा नंबर ब्लॅक लिस्ट केला, तरी तो व्यक्ती नंबर बदलून वारंवार फोन करून शिवीगाळ करत होता”, असे वसंत मोरे म्हणाले आहेत.
मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केलाय की अगदी मनसे वाले माझी मर्डर करण्यापर्यंत गेले…?
संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे मागणी केली आहे…
पाहू पोलिस आता यावर काय भुमिका घेतात… pic.twitter.com/cJURdWJBoX
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) July 19, 2024
“शेवटी ती शिवीगाळ करणारी व्यक्ती बोलली, मी मनसेवाला आहे. त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच नाव घेतलं. मी त्यावेळी म्हणालो, कुणी तरी दारू पिऊन शिवीगाळ करत असेल. नंतर माझ्या लक्षात आलं की, हा एक प्लॅन आहे. हा प्लॅन कोण करू शकतं? तर हे मला माहिती आहे”, असे सांगताना वसंत मोरे यांचा रोख साईनाथ बाबर यांच्याकडे होता. वसंत मोरेंच्या या आरोपानंतर आता यामागे नेमकं कोण हे समोर येणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘गुलाबी मंच अन् गुलाबी कोट’, अजित पवारांच्या ‘त्या’ गुलाबी कोटचं रहस्य काय?
-होमग्राऊंडवर अजित पवारांना आणखी एक धक्का; आमदार घेणार हाती तुतारी, पवारांची भेटही झाली
-अजित पवारांच्या आमदाराचे भाकीत, “तर दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात…”
-अजित पवारांच्या गुलाबी कोटवरुन अमोल कोल्हेंचा खोचक टोला म्हणाले, ‘त्यामागचा हेतू राज्याचं…’