पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आणि २ कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी सीआयडी आणि पोलिसांना शरण आला आहे. अशातच पुण्यातील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी या घटनेवरुन सोशल मीडिया पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
वाल्मिक कराड मंगळवारी अचानक एका पांढऱ्या स्कॉर्पिओमधून साडेबारा वाजताच्या सुमारास सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला. त्यावेळी देखील काही कार्यकर्ते हे सीआयडी ऑफिसच्या बाजूला उपस्थित होते. त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. याबाबतच्या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत वसंत मोरे यांनी वाल्मिक कराड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
“वाल्मिक कराड आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावं ही तुमच्या बीडची मीडिया नाही हे आमचे अस्सल पुणेकर मीडियावाले आहेत, इथे सापडला की ठोकला”, अस वसंत मोरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्य बजावणाऱ्या पीएसआयचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
-पुण्याचे पालकमंत्री कोण? दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘कोणी काहीही म्हणू..’
-दारू नको दूध प्या जीवनाचा आनंद घ्या, आमदार रासनेंच्या संकल्पनेतून भाजपचा अनोखा उपक्रम
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष रेल्वे
-‘आता पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृहमंत्रालय कॉम्प्रोमाईज्ड आहे का?’- अंजली दमानिया