पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची सर्व पक्षांकडून तयारी सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एप्रिल, मे महिन्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच भाजपने येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून बैठकांचा सापटा लावला आहे. आपल्याला पुणे जिंकायचंच’ बावनकुळेंचा नारा, स्वबळावर लढण्याची तयारी
आज पुण्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीची भाजपची रणनिती सांगितली आहे. निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसल्याचे पहायला मिळत आहे. भाजपने राज्यभर बैठकांचा सपाटा लावला आहे. ‘पुणे महानगरपालिका निवडणुकीत कमळ फुलवायचं आहे. एपिल, मे महिन्यात महापलिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि बूथ अध्यक्ष निवड लवकर करा. एक कोटी ५१ लाख सदस्य असा संकल्प करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवातून शिकलो आहे’, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
‘अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले २१ उमेदवार दिले होते. त्यामधील ११ निवडून आलेत, ते महायुतीचे उमेदवार होते. आपण योजनाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार आहे. एक लाखांपेक्षा जास्त विशेष कार्यकारी अधिकारी नेमायचे आहेत. राज्यात १ कोटी ५१ लाख सदस्य जोडणीचे अभियान सुरू केले असून राज्यात पुन्हा एकदा घर चलो अभियान राबवण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण विषय आहे. कोर्टाने जे काही मागितलं होतं, ते सगळं दिलं आहे. निवडणूक आयोगाला कोर्ट लवकरच योग्य सूचना देईल’, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
‘आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सगळी तयारी करत आहोत. १३ हजार सीट्सवर निवडणूक व्हाव्यात ही आमची इच्छा आहे. संपूर्ण पालिका निवडणुका एकत्रित लढणार आहे. महायुती सर्व नगरपालिका, महानगरपालिका पंचायत समिती जिंकेल’, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रसिद्ध कॅफेमधून ऑर्डर केला चॉकलेट शेक अन् डिलिव्हर झाला ‘उंदीर शेक’, पुढे काय झालं?
-रात्री-अपरात्री मांजराचे आवाज एक महिला अन् ३५० मांजरी; नेमका काय प्रकार?
-मॅट्रिमोनिअल साईटवरची ओळख पडली महागात, लग्न होण्याआधीच आयटीमधील तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार
-GBS: पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे ‘जीबीएस’ची लागण; काय म्हणाले अजित पवार?
-महाराष्ट्र केसरी: राक्षे-मोहोळ कुस्ती पुन्हा रंगणार? ५ जणांची चौकशी समिती