पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2024 (UPSC) च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत शक्ती दुबेने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर हर्षिता गोयल ही देशात दुसरी आली आहे. पुण्याचा अर्चित डोंगरे हा महाराष्ट्रात पहिला आला आहे. अर्चित डोंगरे हा देशात तिसपा आला आहे.
देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, यूपीएससी सीएसईमध्ये दरवर्षी लाखो इच्छुकांचा सहभाग दिसून येतो. ही परीक्षा भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय महसूल सेवा, भारतीय व्यापार सेवा आणि इतर गट अ आणि ब केंद्रीय सेवांसारख्या प्रतिष्ठित पदांसाठी प्रवेशद्वार म्हणून काम करते.
यूपीएससीत सीएसई यशस्वी झालेले टॉपर्स
१. शक्ती दुबे
२. हर्षिता गोयल
३. डोंगरे अर्चित पराग
४. शाह मार्गी चिराग
५. आकाश गर्ग
६. कोमल पुनिया
७. आयुषी बन्सल
८. राज कृष्णा झा
९. आदित्य विक्रम अग्रवाल
१०. मयंक त्रिपाठी
युपीएसीकडून २०२४च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण ११३२ पदांसाठी भरती काढली होती. दरम्यान युपीएससी परीक्षेत यंदाही मराठमोळ्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आला असून महाराष्ट्रात पहिला क्रमांक त्याने पटकावला आहे.
महत्वाच्या बातम्या
-भाजप मंडल अध्यक्ष व्हायचं असले तर DNA…; ‘त्या’ बॅनरची राज्यभर चर्चा
-राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्याची चर्चा; महाराष्ट्रात येताच युतीची घोषणा करणार?
-पालिकेने EWS सदनिकांची दुरावस्था; कोट्यवधींची चोरी, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
-‘आरटीई’ प्रवेशाची आज शेवटची संधी! आजच आपल्या मुलांचे अॅडमिशन फिक्स करा
-वॉटर पार्कला जाताना काळजी घ्या! झीपलाईन करताना तरुणीचा पाय घसरला अन्…