पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात मोठा वाद झाला. यावरुन जिल्ह्यातील ६ अधिकारी आणि २० कर्मचाऱ्यांची मस्साजोग प्रकरणी अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या मर्जीतले असल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला. त्यानंतर आज तृप्ती देसाई आज बीडमध्ये दाखव झाल्या होत्या.
तृप्ती देसाईंनी २६ अधिकारीी कर्माचाऱ्यांचे महत्वाचे पुरावे असणारा पेन ड्राईव्ह पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल केला. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी या प्रकरणी चौकशी केली असून देसाईंचा जबाब नोंदवून घेतला आहे. तृप्ती देसाईंना पोलीस दलातील २६ अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे देसाई यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना सादर केले आहेत.
‘२६ अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे मी दिले असून माझा जबाब घेण्यात आला आहे. याचे सर्व पुरावे पेन ड्राइव्हच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या अधिकारी कर्मचाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवावे, असे तृप्ती देसाईंनी सांगितले आहे. त्यातील अनेक कर्मचारी एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ‘आज घेण्यात आलेल्या जबाबानंतर याची गोपनीय चौकशी करू’ असे आश्वासन देसाई यांना देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्यांनी ‘जय शिवराय’ नाही, तर ‘अल्ला हू अकबर’ म्हणावं’; नितेश राणेंनी राष्ट्रवादीला डिवचलं
-पत्नी आमदार तरीही पतीदेवांना विधान परिषदेची लॉटरी, अजितदादांचा पुण्यातील नेत्यांना ठेंगा
-डॉक्टरांकडूनच होतेय परस्पर औषधांची विक्री, FDAची मात्र डोळेझाक, कारवाई कधी होणार?
-‘बरं झालं पक्ष फुटला, अशा पुरुषासोबत मी काम करु शकत नाही’; सुप्रिया सुळेंच्या भाषणाची क्लिप व्हायरल