पुणे : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नेत्यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी देखील आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली आहे. अशातच अधिवेशन सोडून आलेल्या विजय शिवतारेंनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आलो कारण दोन तीन दिवसात जे काही झालं त्यामुळे माझा मूड गेला. पात्रता असताना देखील डावले गेलं. डावलण्यामागे एकनाथ शिंदे यांची कारणे असतील. मला मंत्रिपद का नाकारले मला माहित नाही. मंत्रिपद मिळेल म्हणून कुटुंबातील सगळे लोकं नागपुरात आले. एखादा माणूस निधन झाल्यावर जसा मातंग होता, तसा झाला त्यामुळे मी अस्वस्थ होतो, असे विजय शिवतारे म्हणाले आहे.
“कार्यकर्ते गाड्या घेऊन आले होते, त्यांचा अपेक्षा भंग झाला. कॅपिसिटी होती म्हणून वाटत होते मंत्रिपद मिळेल, पण तसे झालं नाही. मंत्रिपद मिळणार नाही हे दोन दिवसापूर्वी मला सांगितले असते तर शांत राहिलो असतो, उलट मी थांबून दुसऱ्याला मंत्रिपद दिलं असतं”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
“विजय शिवतारे पक्षाचा माणूस आहे. जर विजय शिवतारे यांना मंत्रिपद विचारलं नाहीतर विजय शिवतारे कुणाला विचारणार नाही. आमच्या वाईटावर असून सुद्धा २७ हजाराचा मताधिक्य जनतेने मला दिलं, त्यांची सेवा मला करायची आहे. कोण वाईटावर आहे हे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे कशाला ते बोलायचं. माझं मंत्रिपद कापण्या इतपत त्यांची पोहोच नाही” असं म्हणत विजय शिवतारेंनी अप्रतक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आयटी कर्मचाऱ्यांसाठी पुणे मेट्रोची गुडन्यूज; आता मेट्रो धावणार…
-स्वारगेट-कात्रज मार्गावरील मेट्रो स्थानकांच्या अंतरात होणार बदल; किती अंतरावर असणार स्थानके?
-धक्कादायक! गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा: ११ वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
-‘…तर आमच्याकडूनही जशास तसं उत्तर दिलं जाईल’; भुजबळ समर्थकांना दीपक मानकरांचा इशारा
-आंतरजातीय विवाह केला? घरच्यांचा विरोध; आता सरकारच देणार रहायला खोली