पुणे : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यावर गेल्या काही वर्षांपूर्वी एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दाखल केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून राठोड यांना दिलासा मिळाला आहे. चित्रा वाघ यांनी दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. संजय राठोड यांना या निर्णयामुळे चांगलाच दिलासा मिळाला.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयानं हा निर्णय घेतला. “याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला अहवाल आणि महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल पाहता, या प्रकरणात आणखी चौकशी करण्याची गरज नाही,” असे मत व्यक्त करून खंडपीठाने हे प्रकरण निकाली काढले आहे.
८ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात एका तरुणीने त्याच्या घराच्या बाल्कनीतून खाली उडी मारली अन् तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तात्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात भाजपच्या महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांनी आवाज उठवला होता. वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली. चित्रा वाघ यांनी या तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करून त्याद्वारे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवण्याची मागणी देखील केली होती.
हे प्रकरण घडत असताना संजय राठोड हे शिवेसना उद्धव ठाकरेंच्या पक्षात होते. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी बदलल्यानंतर राठोड यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश करत सत्तेत जाऊन बसले. शिंदेंच्या मंत्रिमंडळात राठोड पुन्हा मंत्री झाले. २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात चित्रा वाघ यांनी उच्च न्यायालयाकडे हे प्रकरण रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळ बदलत्या राजकीय परिस्थितीत चित्रा वाघ यांची याचिकेतील मागणी बदलत असल्याचे न्यायालयाने ताशेरे ओढले होते. आता या पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात दाखल केलेली जनहित याचिका मुंबई न्यायालयाने फेटाळून लावल्याने राठोड यांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! माजी खासदाराच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
-Pune GBS: ‘त्या’ विहिरीतील पाण्याचा अहवाल आला; नेमकं काय म्हटलंय पालिकेच्या अहवालात?
-दुचाकी चालकाला अरेरावी अन् मारण्याची धमकी? नेमकं काय घडलं, बागुलांनी स्पष्टचं सांगितलं
-पुण्यात ‘GBS’चं थैमान! २४ रुग्णांवर आयसीयूत उपचार, शहरात नेमकी रुग्णसंख्या किती?