पुणे : स्वारगेट बस स्थानाकातील अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये पहाटे 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधम दत्तात्रय गाडेच्या पुणे पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. रात्री 1 वाजताच्या सुमारास पुण्यातील शिरूर तालुक्यातील त्याच्या गुनाट गावातूनच पुणे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या आहेत.
आरोपी एका शेतातील कॅनलच्या बाजूला झोपला असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तब्बल 75 तासांनी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पुणे पोलीस आरोपीला घेऊन लष्कर पोलिस स्टेशनला दाखल झाले आहेत. पुणे पोलीस हद्दीतील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला ठेवण्यात आला आहे. लष्कर पोलीस स्टेशनमधून उद्या दुपारी अडीचच्या दरम्यान आरोपीला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे.
सध्या पुणे पोलिसांकडून या आरोपीचा कसून तपास केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोपी कुठे कुठे फरार होता याची चौकशी पुणे पोलिसांकडून उद्या दुपारपर्यंत केली जाणार आहे. पुणे पोलीस हद्दीतील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या डीबीकडून या आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन डी बी टीम सहित गुन्हे शाखेची टीम आरोपीच्या मार्गावरती होती. त्यामुळे स्वारगेट डीबीटींच्या अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: स्वारगेट अत्याचार प्रकरणी पालकमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया म्हणाले,…
-‘हे आपल्या व्यवस्थेला शोभणारं आहे का?’ शरद पवारांच्या आमदाराचा संतप्त सवाल
-फलकमुक्त कसब्याकडे वाटचाल; अनधिकृत फ्लेक्स हटवून आमदार रासनेंनी केली निश्चयाची अंमलबजावणी
-स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; राज्य परिवहन मंत्री मिसाळ काय म्हणाल्या?