पुणे : कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयामधील डॉ. अजय तावरे आमि डॉ. हरनोळ यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. तसेच या अपघातापूर्वी अल्पवयीन आरोपी हा पबमध्ये मद्यप्राशन केले त्यावेळी त्याच्यासोबत आणखी काहीजण होते. ती मुले कोणाची होती? याची माहिती पोलिसांनी का लपवत आहेत? असे सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.
सुषमा अंधारे यांनी बुधवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी पुणे अपघाताच्या तपासाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. या संपूर्ण प्रकरणात पुण्यातील बड्या राजकीय असामींचा संबंध असल्याचा संशय अंधारे यांनी व्यक्त केला आहे.
4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन.
पण तोवर डॉ अजय तावरे च्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते. @PTI_News @ANI— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 29, 2024
सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्यांचे चेहरे ब्लर दिसत आहेत. हे सर्वजण अल्पवयीन असल्याने कदाचित त्यांचे चेहरे व्हिडीओत ब्लर केले असतील. पण पोलिसांकडे या सगळ्यांची माहिती असेल ना? व्हिडीओत ब्लर केलेले चेहरे कोणाचे आहेत? ते कोणत्या बड्या व्यक्तीशी संबंधित आहेत का? त्यांचा वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? विशाल अग्रवाल यांच्यासोबत असणारा मुलगा कोणत्या आमदाराचा मुलगा आहे का? मग त्या आमदाराशी सुनील टिंगरे यांचा काय संबंध? असे गंभीर प्रश्न यावेळी सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत.
सुषमा अंधारे यांनी आज आमदार टिंगरे यांचेही नाव घेतले. ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये अनेक ग्लॅमरस नेम-फेम असणारे आणि बडे प्रस्थ दाखल झाले. हे बडे प्रस्थ मध्यरात्री पोलीस स्थानकात का दाखल झाले होते?, जर खरंच सुनील टिंगरेंनी डॉ. अजय तावरेंची शिफारस केली होती. मग टिंगरेंनी त्यातून वॉकआऊट करण्याचा प्रयत्न का केला? टिंगरेंनी होय, मी शिफारस केली होती, असं ठामपणे का सांगितले नाही? शिफारस पत्र व्हायरल झाल्यानंतर त्यावर खुलासा करण्याची गरज आणि वेळ टिंगरेंवर का आली?, असे अनेक सवाल सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक: विशाल अग्रवालचे डॉ. तावरेंसोबत २ तासात १४ फोन; ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्लॅन कोणाचा?
-पोलीस कारवाईचा बार मालकांनी घेतला धसका, “आता टेबलवर ग्राहकांना दिला जातोय….”