पुणे : बीड जिल्ह्यातील एका गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत आहे. अशातच या प्रकरणी २ वॉन्टेड आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केली. त्याआधी २ दिवसांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणी खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण आला. कराडवर आरोप होत असताना अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल होत आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतही कराड यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. या सर्व प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
“बीड आणि परभणी प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून सरकारने पारदर्शक कारभार करावा. संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी बीड आणि परभणी प्रकरणांमध्ये योग्य निर्णय घ्यावा एवढीच सरकारकडून अपेक्षा आहे. आमचे वाल्मिक कराडशी असलेले संबंध आम्ही कधीही नाकारले नाहीत. एकाच पक्षात असल्याने एकत्र फोटो असणारच”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“उशिरा का होईना गुन्हेगारांना अटक झाली, विशेष म्हणजे आरोपींना पुण्यातून अटक कशी होते? याबद्दल पोलिसांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट काढले पाहिजे. दिल्लीतही या केसची खूप चर्चा आहे. अनेक जण या केस संदर्भात विचारणा करतात”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोघांना बेड्या; आमदार रोहित पवार म्हणाले, ‘या महाराष्ट्रात…’
-पुण्यात डॉक्टरने घातली पालिकेला टोपी; पण असं फुटलं बिंग…
-संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, वॉन्टेंड आरोपींना पुण्यातून अटक
-अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘सरकार्यवाह’पदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
-भगवान श्री ऋषभ फकीर “नीलमणी” पंचमी महोत्सवात अनुभवायला मिळणार आत्मशांतीची दिव्य अनुभूती