पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी आता दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे भरदिवसा कोणतीही भीती न बाळगता गुन्हे केले जात आहेत. खून, चोरी, लूट, हत्या, बलात्कार यासारखे अनेक गुन्हे रोज घडत आहेत. अशातच आता सायबर गुन्हेगारी देखील समोर येत आहे. पुणे शहरातून गेल्या ८ महिन्यात सायबर गुन्ह्यातून तब्बल २८ कोटी रुपयांची लूट केली असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.
सायबर गुन्हेगार हे दररोज पुणेकरांना फेक कॉल करुन लाखो, कोट्यावधींना गंडा घातल आहेत. बँक खात्याशी संबंधित केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने तर कधी थकीत वीज बील, एमएनजीएल बील भरण्याच्या बहाण्याने फेक कॉल केले जात आहेत. कोथरुडमधील एका व्यक्तीला देखील असाच एक कॉल आला आणि त्यांचं बँक खातं रिकामं झालं आहे. एमएनजीएल बिल भरण्यासाठी लिंकवर क्लिक करायला सांगून या व्यक्तीला तब्बल साडे ७ लाख रुपयांना गंडा घातला आहे.
हिंगणेमधील एका व्यक्तीला वीज बिल न भरल्यास वीज कापली जाईल, असा मेसेज करुन ११ लाख रुपयांची फसवणूक केली गोती. तसेच अॅमेनोरा पार्कमधील एका व्यक्तीला तुमचे पैसे ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रींगसाठी वापरले आहेत, असे सांगून तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पुणेकरांना सावधान राहणे आवश्यक असून अशा प्रकराच्या फेक कॉलला बळी पडू नये, असे आवाहन गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्याकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात तीन जागांवर महायुतीची डोकेदुखी; भाजपसह राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या दाव्याने चुरस
-पुणेकरांना आता शहरातील ध्वनीप्रदूषणाची पातळी पाहता येणार; शहरात लागणार डिजीटल बोर्ड
-पुणे गणेशोत्सव: शहरातील ‘हे’ मुख्य रस्ते आजपासून बंद; पर्यायी मार्ग कोणते?
-मद्यधुंद नशेत चालकाने मनसे पदाधिकारी, त्यांच्या पत्नीच्या अंगावर घातला टेम्पो अन्…