पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी काँग्रेसचा हात सोडला अन् हाती शिवबंधन बांधलं. धंगेकर काँग्रेसला रामराम करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस आधीच रंगल्या होत्या. धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रम, आंदोलन, पक्षाच्या बैठकांना हजर राहत नसल्याचे पहायला मिळत होते. अखेर काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पुणे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
‘ससून, पोर्शे कार, पब, ड्रग्स हे सगळे आंदोलन त्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठीच व्यक्तीगत आंदोलन केले. यामध्ये कुठेही काँग्रेसचा झेंडा नव्हता. विधानसभेचं सत्र चालू असताना याचा फॉलोअप देखील झाला नाही. हा पुण्यातील वाल्मिक कराड आहे. ज्याची विचारधारा शुन्य त्यावर बोलणार नव्हती, पक्ष कुठच कमी पडला नाही. चारवेळा संधी दिली तरी गेले, मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता. पक्षाने ३ वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ४ वेळा संधी दिली. ज्यादिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही. खालच्या थराला जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांविषयी बोलणार नाही. त्यांच्या व्यक्तीगत दुष्कारणांसाठी गेले, असे म्हणत अरविंद शिंदे धंगेकरांबाबत बोलणार नाही म्हणत खूप काही बोलून गेले आहेत.
काँग्रेस पक्षाने मान दिला, पक्षाच्या कुठल्याच आंदोलनाला ते आले नाही. आता यांना मतदारांनी नाकारलं आहे, त्यांना लीड घेता आल नाही. पक्षाने माझ्यासाठी काम करावं मी पक्षासाठी काम करणार नाही अशी भूमिका ते घेत होते. यापुढे पक्षाला विनंती अशा लोकांना पक्षात घेऊ नये, यांचा इतिहास असाच आहे. विचारधारा एक नाही काहीच नाही. हे संधीसाधूपणा करत आहेत. ज्या आंदोलनामध्ये पक्षाचा झेंडा नाही. पक्षाचे शहराध्यक्ष नाही, पक्षाचे मुख्य कार्यकर्ते नाहीत, फक्त आज प्रवेश केलेले त्यांचे स्वत:चे व्यक्तीगत कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन करतात त्याचा अर्थ काय? असा सवालही यावेळी अरविंद शिंदे यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मेट्रो मार्गावर आंदोलनाचा मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु, न्यायालयात नेमकं काय झालं?
-पुण्यात होणार दोन मेट्रो मार्गिकेचा विस्तार; राज्याने पाठवला तब्बल एवढ्या कोटींच्या निधीचा प्रस्ताव
-लाडक्या बहिणींसाठी आणखी ३६ हजार कोटींची तरतूद पण तरीही २१०० रुपये नाहीच
-आधी म्हणायचे मी काँग्रेसचा हिरो, आता धरली शिंदे सेनेची वाट; रवींद्र धंगेकर चौथ्यांदा पक्ष बदलणार
-शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांच्या अंगावर ओतलं पेट्रोल अन्…