पुणे : महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरीही अद्याप अनेक ठिकाणी मराठी भाषेचा वापर कमी होताना दिसत आहे. अशातच आता उपरोक्त संदर्भीय शासन आदेशानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळातील सर्व विभागांना प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक असल्याचे सक्त आदेश पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिले आहेत.
सर्व पत्रव्यवहार, कार्यालयातील कामकाज, सर्वसामान्यांपर्यंत जाणारे सर्व नमुने, पत्रके, परवाने, नोंद वहया, प्रमाण नमुने, प्रपत्रे, विभागीय नियम पुस्तिका, सर्व प्रकारच्या टिपण्या, नसत्या, शेरे, अभिप्राय, आदेश, अधिसुचना, प्रारूप नियम, कार्यालय परिपत्रके, करारनामे, अहवाल, बैठकांची इतिवृत्त, इत्यादी मराठी भाषेमध्ये करणे आवश्यक आहे.
तसेच कार्यालयातील नामफलकावर एखादी व्यक्ती, अधिकारी, कर्मचाऱ्याची नावे मराठी भाषेमध्येच असणे आवश्यक आहे. कार्यालयीन नामफलकांवर एखादी व्यक्ती, अधिकारी,कर्मचाऱ्यांचे नाव मराठी भाषेत लिहिताना इंग्रजी अद्याक्षरांचे भाषांतर न करता मराठीतूनच लिहावेत, असे देखील आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कार्यालयातील निविदा, ठेकेदारांशी केलेले करार, वेगवेगळ्या कंपन्या, आस्थापनांशी केलेले करार राजभाषा अधिनियम १९६४ नुसार हे सर्व मराठी भाषेतून करावे. तरी संदर्भीय शासन आदेशानुसार महामंडळातील सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुख यांनी दिलेल्या सुचनांनुसार मराठीतून कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्यणामुळे आगामी काळात याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार असल्याचा विश्वास पीएमपीकडून व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेंची भेट धंगेकरांना महागात, काँग्रेसने महत्त्वाच्या कमिटीत घेणं टाळलं; नेमकं काय घडलं?
-गजा मारणे टोळीची दहशत, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या माणसाला मारहाण; पुण्यात नेमकं चाललंय काय?
-पालिकेचे पाणी पिण्यास योग्य नाहीच! तपासणीतून कोणती माहिती समोर आली?