पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजाराचे रुग्ण वाढत आहे. पुणे शहरात शंभरी पार केली आहे. आता जीबीएस आजाराची चिंता वाढू लागली आहे. या आजाराचे रुग्ण पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील रुग्ण सर्वाधिक आढळून आले असून या आजाराने आतापर्यंत ३ बळी घेतले आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता आता आणखी वाढली आहे.
पुण्यातील नांदेडगाव परिसरातील ६५ वर्षीय नागरिक, सिंहगड परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय महिला, पिंपळे गुरवमधील ३६ वर्षीय तरुण तर पिंपरी चिंचवडमधील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सिंहगड परिसरातील ५६ वर्षीय महिला ही कॅन्सरग्रस्त होती. जिल्हा ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. पिंपळे गुरव परिसरातील ३६ वर्षीय तरुणावर पालिकेच्या वायसीएस रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. गेल्या ८ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असणाऱ्या या तरुणाचा गुरुवारी (काल) उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत जीबीएसचे एकूण १३ रुग्ण आढळले आहेत, तर शहरामध्ये हा पहिला बळी ठरला आहे. पुण्याहून सोलोपूरला गेलेला एक, पुण्यात दोन तर पिंपरी चिंचवडमध्ये एक अशा एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांनो, आता स्वत:ची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. जीबीएस या दुर्मिळ आजारामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपायांना गंभीर कमजोरी, अतिसार अशी लक्षणे जावणतात.
डॉक्टरांच्या मते, ‘जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित अन्न पाण्यामुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.’ आता गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, नागरिकांच्या शंकेचे निरसन व्हावे, यासाठी महापालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. हेल्पलाईन २४ तास सुरू आहे. तज्ञ वैद्यकीय अधिकारी २४ तास उपलब्ध असतील. या आजाराबाबत चौकशी करण्याकरिता नागरिकांनी ७७५८९३३०१७ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यात १५ हजार महिलांच्या उपस्थितीत “सन्मान स्त्री शक्तीचा” गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
-Pune GBS: केंद्राने महाराष्ट्राच्या मदतीसाठी टीम पाठवली पण…; नागरिक संतप्त, वाचा नेमकं काय झालं?
-आश्चर्यकारक! गर्भवती महिलेच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटात बाळ; नेमका काय प्रकार? वाचा…
-Pune GBS: 30 हजार घरांचे सर्व्हेक्षण अन् पालिकेने जाहीर केले जीबीएस बाधित क्षेत्र