पुणे : आजपासून दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील कात्रज दूध संघाच्या मुख्यालयात सहकारी आणि खासगी दूध संघाची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यासह मुंबईही पिशवीतलं दूधही महागणार आहे. आजपासून (१५ मार्च) गायीचे दूध प्रतिलीटर ५८ रुपये तर म्हशीचे दूध प्रतिलीटर ७४ रुपयांनी मिळणार आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन दुधाच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २ रुपयांप्रमाणे दूधाच्या किंमतीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ हे १५ मार्चपासून लागू करण्यात येणार असल्याचे दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले आहे. पुण्यात झालेल्या बैठकीला ४७ दूध संघटना उपस्थित होत्या. मात्र, मुंबईतील दूध संघटनांनी दरवाढीला विरोध करत दर न वाढवण्याचे ठरवले आहे.
‘हा निर्णय आमच्या खिशाला कात्री लावणारा आहे, असे ग्राहकांचे मत आहे. तर आम्हाला हे परवडत नाही सर्वांनी विचार करावा, असेही ग्राहक बोलत आहे. विक्रेत्यांच्या मते दरवाढ तर झालेली आहे, इतर गोष्टींची ही महागाई झालेली आहे. ग्राहकांना नवे दर समजावून सांगावे लागतील, असे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात महिला असुरक्षितच; स्वारगेट प्रकरणानंतर आता आणखी एका तरुणीवर अत्याचार
-पुणेकरांच्या हितासाठी जगदीश मुळीकांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी
-आमदाराच्या मामाला संपवण्यापूर्वी जादूटोणा अन् मंत्रतंत्र; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड
-हप्ते वसूल करून आंदोलन… राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी धंगेकरांची कुंडलीच काढली