पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळाले असून महायुतीला २८८ पैकी २३५ जागांवर यश मिळले आहे. निवडणूक झाली आता सत्तास्थापनेबाबत राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहेत. पुणे शहर, पिंपरी–चिंचवड तसेच जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.
बारामती मतदारसंघातून अजित पवार, आंबेगावमधून निवडून आलेले दिलीप वळसे-पाटील, कोथरूडचे चंद्रकांत पाटील यांची नावे मंत्रिपदासाठी निश्चित मानली जात आहेत. पर्वतीच्या माधुरी मिसाळ, दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा राज्यमंत्रिपदासाठी आहे.
विधानसभा निवडणुकीत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये महायुतीचे १८, महाविकास आघाडीचे केवळ २ आणि १ अपक्ष असे आमदार निवडून आले आहेत. सलग ८ वेळा निवडून येण्याचा रेकॉर्ड अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार, वळसे पाटील हे मंत्री होणार हे निश्चित आहे. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा मंत्री होणार आहेत. तसेच पर्वतीच्या माधुरी मिसाळ, दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्रिपदासाठी वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर भाजपची सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ
-‘बारामतीचा एकच दादा’; अजितदादांनी शरद पवारांवर मात करत पुतण्याचा केला पराभव
-‘मी चॅलेंज देतो तू आमदारच कसा होतो तेच बघतो’; अजितदादांनी चॅलेंज पूर्ण केलं?
-‘मिशन पश्चिम महाराष्ट्र पूर्णत्वास’- मुरलीधर मोहोळ
-Kasba Vidhansabha: मित्र आमदार झाला! केंद्रीय मंत्री मोहोळांनी रासनेंना खांद्यावर घेत जल्लोष केला