पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनाला लागलेल्या गळतीमुळे ठाकरे सेना आता अलर्टमोडवर आली असून पक्षातील नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून पक्ष सोडणाऱ्यांची मने वळवण्याचे प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे पक्षाचे ६ खासदार जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्याबाबत काही मोठे निर्णय घेतले आहे.
पुणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंनी माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पुणे महानगरपालिका प्रमुख निवडणूक समन्वयक म्हणून वसंत मोरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. नुकतीच वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वसंत मोरेंवर ही जबाबदारी सोपण्यात आली आहे. मोरेंना पालिका प्रमुख निवडणूक समन्वयक म्हणून जबाबदारी मिळताच वसंत मोरे यांनी ‘आता लावा ताकद’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आज माझी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच आमदार आदित्यजी ठाकरे साहेब व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ आहेर व सहसंपर्कप्रमुख आदित्यजी शिरोडकर साहेब यांच्या सहकार्याने pic.twitter.com/8bLNarSbIm
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) February 7, 2025
दरम्यान, ठाकरे सेनेतील नेते पक्षांतर करणार असल्याने उद्धव ठाकरे हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर येणार आहेत. उद्धव ठाकरे हे पुण्यातील काही शाखांना भेट देणार असून त्यानंतर सर्व शाखा प्रमुखांची संयुक्त बैठक घेणार आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप ठाकरे सेनेतील नाराजांना गळाला लावण्यासाठी गळ टाकून बसले आहेत. दुसरीकडे शिंदेंच्या मिशन पुणेला टक्कर देण्यासाठी ठाकरेंनी सुरवात केली केल्याचं पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत पुणेकरांच्या करवाढीसाठी महत्वाचा निर्णय
-Pune GBS: ‘जीबीएस’मुळे पुण्यात आणखी एकाचा मृत्यू; रुग्णसंख्या १७३ वर
-‘महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर…’; अजितदादांचा AK47 हातात घेऊन निशाणा कोणावर?
-मुख्यमंत्री फडणवीसांसमोर पुन्हा एकदा पॉलिकल ड्रामा; अजितदादांनी आमदार लांडगेंना सुनावलं
-‘आता जर शिट्या वाजवल्या तर…’; अजित पवारांनी भरला शिट्ट्या वाजविणाऱ्यांना दम