पुणे : पुणे शहरात कोथरुडमध्ये काकडे फार्म येथे आज दिलजीत दोसांझचा म्युझिक कॉन्सर्ट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जवळपास ५० हजाराहून अधिक नागरिक येण्याची शक्यता आहे. दिलजीत दोसांझ यांच्या आजवरच्या कार्यक्रमाची एकूणची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर स्थानिक नागरिकांनी दिलजीतच्या या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. तसेच स्थानिक नेत्यांसह मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील विरोध केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी हा रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
‘पुण्यात कोथरूडमधील काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ च्या म्युझिक कॉन्सर्टला माझा स्थानिक आमदार म्हणून तसेच पण एक नागरिक म्हणून माझा विरोध आहे.फक्त दारू विक्रीसाठी विरोध नाही, तर या कार्यक्रमामुळे ट्रॅफिक जाम आणि कर्कश आवाजाला सुद्धा माझा विरोध आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा,अशा सूचना मी पोलीस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी यांना दिली आहे’ असे चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘असे कार्यक्रम समाजाला लागलेली किड आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये हा कार्यक्रम झाला तर भाजपच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेन, असेही या निवेदनात म्हटले आहे. दिलजीत दोसांझ यांच्या म्युझिक कॉन्सर्ट चा कार्यक्रम काही तासांवर आला असून आता प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.
‘काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमास माझा जाहीर विरोध आहे. या कार्यक्रमामुळे खुलेआम दारू विक्री, कर्कश आवाज तसेच वाहतुक कोंडी या सगळ्या समस्यांना कोथरूडमधील नागरिकांना सामोरे जावे लागणार आह. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजकांनी त्वरित रद्द करावा. कोथरूडची संस्कृती खराब करणाऱ्यांना आमचा कायम विरोध आहे. कार्यक्रम रद्द न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल’, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? या ४ आमदारांची नावे चर्चेत
-विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर भाजपची सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ
-‘बारामतीचा एकच दादा’; अजितदादांनी शरद पवारांवर मात करत पुतण्याचा केला पराभव
-‘मी चॅलेंज देतो तू आमदारच कसा होतो तेच बघतो’; अजितदादांनी चॅलेंज पूर्ण केलं?