पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कारनाम्यांची दखल घेत युपीएससीने त्यांना नोटीस बजावली आहे. ‘तुमच्या विरोधात गुन्हा दाखल का केला जाऊ नये’, अशी नोटीस बजाविली आहे. केंद्र सरकारने देखील त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. पूजा खेडकर यांनी अपंगत्वाची खोटी कागदपत्रे दिल्यांवरुन चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे केलेल्या कारनाम्यांवरुन अटकेची टांगती तलवार डोक्यावर लटकत आहे.
पूजा खेडकर यांनी अपंगत्वाची कागदपत्रे सादर केल्या प्रकरणामध्ये दोषी अढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून पिंपरी महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणावर पिंपरी वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी प्रतिक्रिया देताना ‘वायसीएम रुग्णालयाने दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट नाही’, असे सांगितले आहे.
“जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्हाला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आम्ही संबंधित विभागाची चौकशी करणार आहोत. या विभागांना केलेल्या तपासणीसंदर्बात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्या विभागांनी अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाचं पुनरावलोकन करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करणार आहोत”, असे डॉ. वाबळे म्हणाले आहेत. तसेच पूजा खेडकर यांची युपीएससीकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर या नॉटरिचअबल आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-घालीन लोटांगण, वंदीन बिहार, म्हणत अर्थसंकल्पावरुन अमोल कोल्हेंचा भाजपला खोचक टोला
-अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात काय झाले स्वस्त?
-ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर; डॉक्टरांनीच रुग्णांना…