पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. या प्रकरणी मारेकरी आणि या गुन्ह्यातील मास्टरमाईंड शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देशमुख कुटुंबासह संपूर्ण राज्यातून केली जात आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीमध्ये कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? या प्रश्नावर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते पुण्यामधील एका बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
‘एसआयटी सगळं काम करत आहे. सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. या तपासाच्या माध्यमातूनच आतापर्यंत आरोपींना मोका लावण्यात आला आहे. तसेच वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये कोणालाही सोडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते त्या पद्धतीनेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतील’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 13, 2025
‘मुख्यमंत्री फडणवीस हे २०१४ पासून महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. सरकार गेलं तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर सरकार आलं ते उपमुख्यमंत्री झाले आणि आता मोठ्या बहुमताने ते पुन्हा मुख्यमंत्री झालेत. या सगळ्या काळातील अनुभव असा आहे की, ते काही विषय निष्कर्षापर्यंत येत नाही तोपर्यंत निर्णय घेत नाहीत. मात्र, निष्कर्ष आल्यानंतर ते कोणाला सोडत देखील नाहीत’ असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-RTE ऑनलाईन प्रवेश अर्जाला आजपासून सुरवात; असा भरा अर्ज…
-महायुतीत मिठाचा खडा! तर भाजप अजितदादांच्या पोस्टरला काळं फासणार; बारामतीत नेमकं काय घडलं?
-ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पुण्यासह ५ शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार
-समाजकंटकांकडून टेकड्या जाळण्याचा प्रयत्न; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या महत्वाच्या सूचना
-मामाला संपवण्याची तयारी; पुण्यात बंदुक घेऊन फिरणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात