पुणे : काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्थानिक कामे मार्गी लावण्यासाठी नेते मंडळी झटत आहेत. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी वाढत असून रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी मिसिंग लिंकसाठी आवश्यक निधी देण्यासंदर्भात निवेदन दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना पुणे शहरातील रस्ते विकासासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकारकडून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांची भेट घेऊन मिसिंग लिंकसाठी आवश्यक निधी देण्यासंदर्भात निवेदन दिले.
पुणे शहरातील रस्ते विकासामध्ये… pic.twitter.com/o5izJqtXZ9— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 5, 2025
पुणे शहरातील रस्ते विकासामध्ये येणाऱ्या अडथळ्यांविषयी अजित पवारांसोबत चर्चा केली. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निधीची आवश्यकता असून महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांपैकी १५ प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी ‘मिशन १५’ हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कोथरुड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ३२५ कोटींची आवश्यकता आहे. यापैकी १५० कोटींचा निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे, असलयाचं चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
पुणे शहराचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता, येथील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे रस्ते सुधारणा, पुलांचे बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थापना बाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून विकासकामांना गती देऊन पुणेकरांच्या सोयीसाठी हे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेंच्या ‘मिशन पुणे’ला ठाकरे देणार टक्कर; पुण्यासाठी आखला खास प्लान, नाराजांना रोखण्यात यश येणार?
-मोठी बातमी: संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने उचललं मोठं पाऊल; अवघ्या ३०व्या वर्षी संपवलं जीवन
-गळती धरणाला की निधीला? बांधण्यासाठी लागलेला खर्चापेक्षा दुरुस्तीलाच अधिक निधी
-आमदार झाल्याचा आनंद साजरा करत हत्तीवरुन वाटले पेढे, अन्….; अजित पवारांचा ‘तो’ आमदार कोण?
-‘ऑपरेशन टायगर’साठी एकनाथ शिंदेंचं ‘मिशन पुणे’; ३ माजी आमदार लागले गळाला!