पुणे : राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून ५ नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाला आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.
पुण्यातून ओबीसी चेहरा म्हणून माजी आमदार योगेश टिळेकर यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. तसेच अमित गोरखे यांच्या रुपाने दलित चेहरा देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून उमा खापरे यांच्यानंतर गोरखे हे दुसरे विधान परिषद आमदार असणार आहेत. टिळेकर आणि गोरखे यांच्या उमेदवारीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला विधान परिषदेवर संधी मिळाली आहे.
भाजपकडून लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या महादेव जानकर यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, परिणय फुके, सुधाकर कोहळे, अमित गोरखे, निलय नाईक, योगेश टिळेकर, माधवीताई नाईक या नावांची चर्चा होती. त्यापैकी आता ५ नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-संभाजी भिडेंचं ‘ते’ व्यक्तव्य अन् गिरीश महाजनांनी जोडले कोपऱ्यापासून हात, नेमकं काय घडलं?
-विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो उलटला; २० जखमी, नेमका काय प्रकार?
-काकांचा पुतण्याला धक्का; पुण्यातील नगरसेवक करणार ‘शरद पवार गटा’त प्रवेश
-‘लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत…’; ‘सामना’तून अजित पवारांवर ताशेरे